
मुंबई, दि. १५ : आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी जल-जंगल-जमीन यांच्या रक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे, सहायक कक्ष अधिकारी सुनील जाधव तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले.
००००
आशिष राजपूत/उपसंपादक
- Advertisement -

WhatsApp