जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद

    - Advertisement -

    धुळे, दि. १५ नोव्हेंबर २०२६: आदिवासी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक, स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक आणि अन्यायाविरुद्ध संघर्षाचा प्रेरणादायी इतिहास घडविणारे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांचे कार्य सामाजिक न्याय, समानता आणि स्वाभिमानाच्या मूल्यांची जाणीव करून देणारे आहे.

    यावेळी सहाय्यक महसूल अधिकारी विजय बावा, कैलास सैंदाणे, तांत्रिक सहाय्यक जावेद खान यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    ००००

    - Advertisement -