
मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले. हुतात्मा चौक येथील स्मृतिस्थळावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या ऐतिहासिक लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी 21 नोव्हेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिन’ म्हणून पाळला जातो.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी (अतिरिक्त कार्यभार) बप्पासाहेब थोरात यांनीही हुतात्मा स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विविध पदाधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
0000

WhatsApp