
- फार्मर आयडीसह तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २६ : आतापर्यंत राज्यात ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे दुष्काळ अग्रिम अर्थसाहाय्य वितरित करण्यात येत आहे. आज, २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ९६ लाख ४८ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या खात्यांत ४ हजार ८२४ कोटी २४ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील एकही पात्र शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचित राहणार नाही. फार्मर आयडी आणि काही तांत्रिक अडचणींमुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांतील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यांत रक्कम जमा झालेली नाही, त्यांच्या अडचणी दूर करून त्यांनाही मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडून ९८ लाख २१ हजार २३ शेतकऱ्यांना मदत मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी ९६ लाख ४८ हजार ४८९ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत वितरित झाली आहे. शेतकऱ्यांचे फार्मर आयडी आणि तांत्रिक अडचणी दूर करण्याची प्रक्रिया सुरू असून, अग्रिम मदत वितरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहितीही मंत्री जाधव-पाटील यांनी दिली.
विभागनिहाय व जिल्हानिहाय मदत वितरण पुढीलप्रमाणे
अमरावती विभाग
या विभागातील १५ लाख ८३ हजार ६२५ शेतकऱ्यांना ७९१ कोटी ८१ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यात २ लाख २९ हजार ६७६ शेतकऱ्यांना ११४ कोटी ८४ लाख रुपये, अमरावती जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार ७२५ शेतकऱ्यांना १६९ कोटी ३६ लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यात ४ लाख ३९ हजार ८४१ शेतकऱ्यांना २१९ कोटी ९२ लाख रुपये, वाशिम जिल्ह्यात २ लाख ८ हजार २४९ शेतकऱ्यांना १०४ कोटी १२ लाख रुपये आणि यवतमाळ जिल्ह्यात ३ लाख ६७ हजार १३४ शेतकऱ्यांना १८३ कोटी ५७ लाख रुपये वितरित झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभाग
या विभागात सर्वाधिक ३४ लाख ९३ हजार ९२० शेतकऱ्यांना १ हजार ७४६ कोटी ९६ लाख रुपये वितरित झाले आहेत. बीड जिल्ह्यात ६ लाख ३२ हजार ७४७ शेतकऱ्यांना ३१६ कोटी ३७ लाख रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४ लाख ९५ हजार ३७२ शेतकऱ्यांना २४७ कोटी ६९ लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यात ३ लाख ५९ हजार ५९५ शेतकऱ्यांना १७९ कोटी ८० लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यात २ लाख २८ हजार ४२४ शेतकऱ्यांना ११४ कोटी २१ लाख रुपये, जालना जिल्ह्यात ४ लाख ५० हजार १६२ शेतकऱ्यांना २२५ कोटी ८ लाख रुपये, लातूर जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ३६४ शेतकऱ्यांना २०१ कोटी ६८ लाख रुपये, नांदेड जिल्ह्यात ५ लाख ७४ हजार ४६६ शेतकऱ्यांना २८७ कोटी २३ लाख रुपये आणि परभणी जिल्ह्यात ३ लाख ४९ हजार ७९० शेतकऱ्यांना १७४ कोटी ९० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
कोकण विभाग
कोकण विभागातील ७५ हजार ६७८ शेतकऱ्यांना ३७ कोटी ८४ लाख रुपये वितरित झाले आहेत. पालघर जिल्ह्यात ११ हजार ९८९ शेतकऱ्यांना ५ कोटी ९९ लाख रुपये, रायगड जिल्ह्यात २ हजार २३५ शेतकऱ्यांना १ कोटी १२ लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यात २३ हजार ४३९ शेतकऱ्यांना ११ कोटी ७२ लाख रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८ हजार १५ शेतकऱ्यांना १९ कोटी १ लाख रुपये वितरित झाले आहेत.
नागपूर विभाग
नागपूर विभागातील ८ लाख २७ हजार ९५२ शेतकऱ्यांना ४१३ कोटी ९८ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात १ लाख ११ हजार ५४९ शेतकऱ्यांना ५५ कोटी ७७ लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख १ हजार २०५ शेतकऱ्यांना १०० कोटी ६० लाख रुपये, गडचिरोली जिल्ह्यात ३३ हजार १५१ शेतकऱ्यांना १६ कोटी ५८ लाख रुपये, गोंदिया जिल्ह्यात १ लाख ७ हजार ७८ शेतकऱ्यांना ५३ कोटी ५४ लाख रुपये, नागपूर जिल्ह्यात २ लाख १३ हजार ७५४ शेतकऱ्यांना १०६ कोटी ८८ लाख रुपये आणि वर्धा जिल्ह्यात १ लाख ६१ हजार २१५ शेतकऱ्यांना ८० कोटी ६१ लाख रुपये वितरित झाले आहेत.
नाशिक विभाग
नाशिक विभागातील २० लाख ६१ हजार ७८६ शेतकऱ्यांना १ हजार ३० कोटी ८९ लाख रुपये वितरित झाले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात ८ लाख २० हजार २७३ शेतकऱ्यांना ४१० कोटी १४ लाख रुपये, धुळे जिल्ह्यात २ लाख १४ हजार ९२७ शेतकऱ्यांना १०७ कोटी ४६ लाख रुपये, जळगाव जिल्ह्यात ४ लाख ४० हजार ६८ शेतकऱ्यांना २२० कोटी ३ लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ११ हजार ५९१ शेतकऱ्यांना ५५ कोटी ८० लाख रुपये आणि नाशिक जिल्ह्यात ४ लाख ७४ हजार ९२७ शेतकऱ्यांना २३७ कोटी ४६ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
पुणे विभाग
या विभागातील १६ लाख ५ हजार ५२८ शेतकऱ्यांना ८०२ कोटी ७६ लाख रुपये वितरित झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ८५ हजार १२९ शेतकऱ्यांना ४२ कोटी ५६ लाख रुपये, पुणे जिल्ह्यात ३ लाख ४५ हजार ४६० शेतकऱ्यांना १७२ कोटी ७३ लाख रुपये, सांगली जिल्ह्यात २ लाख ५० हजार ९२३ शेतकऱ्यांना १२५ कोटी ४६ लाख रुपये, सातारा जिल्ह्यात ३ लाख ५ हजार २५५ शेतकऱ्यांना १५२ कोटी ६३ लाख रुपये आणि सोलापूर जिल्ह्यात ६ लाख १८ हजार ७६१ शेतकऱ्यांना ३०९ कोटी ३८ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
फार्मर आयडी पूर्ण करण्याचे आवाहन
ॲग्रीस्टॅक (AgriStack) डेटाच्या माध्यमातून कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तांत्रिक अडचणींमुळे मदत जमा होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. अशा अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.
राज्यातील एकही पात्र शेतकरी दुष्काळ मदतीपासून वंचित राहणार नाही. फार्मर आयडी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांनाही पाच हजार रुपयांची दुष्काळ अग्रिम मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांनी चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे मंत्री जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले.
oooo

WhatsApp