Home शहरे मुंबई मुंबई पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय पडसालगिकर साहेबांची उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पडी निवड

मुंबई पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय पडसालगिकर साहेबांची उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पडी निवड

0

पुणे : परवेज शेख माजी पोलिस महासंचालक तसेच माजी मुंबई पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय पडसालगिकर साहेबांची उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पडी निवड झाली असून त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन .
आठ तास ड्युटीचे जनक मोदींच्या ‘जेम्स बॉण्ड’च्या मदतीला आता मराठी ‘सुपरकॉप’

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मदतीसाठी सरकारने उप राष्ट्रीय सल्लागारांची नियुक्ती केलीय. अजित डोवाल यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांना ‘जेम्स बॉण्ड’ असं म्हटलं जातं. डोवाल यांच्या मदतीसाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आलीय. ते देशाचे नवे राष्ट्रीय सुरक्षा उप सल्लागार असतील. त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षा हा विभाग देण्यात आलाय. पडसलगीकर यांनी IBमध्ये संचालक म्हणून काम केलंय. अतिशय कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून पडसलगीकर यांची ख्याती आहे. ते आता अजित डोवाल यांना मदत करतील. दिल्लीतल प्रतिनियुक्तीवर असतानाच राज्य सरकारच्या विनंतीवरून त्यांची खास मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.