Home गुन्हा खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हा करून वाहनांचे नुकसान करणारे तडीपार गुंडासह दोघेजण जेरबंद

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हा करून वाहनांचे नुकसान करणारे तडीपार गुंडासह दोघेजण जेरबंद

0

पुणे परवेज शेख , दि. ३० ऑक्टोबर : युनिट-३ गुन्हे शाखेने खुनाचा प्रयत्न करून वाहनांचे नुकसान करणाऱ्या तडीपार गुंडासह दोघांना जेरबंद केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश बलकवडे (वय ४९, रा.
कोथरूड) यांच्या घराबाहेर २९ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३०
वाजता तडीपार गुंड नितीन सणस (वय २८, रा. कोथरूड) व
त्याचे साथीदार कुमार घोडे (वय ३०, रा. वारजे माळवाडी) व
अन्य एक साथीदार यांनी येऊन दगडफेक करून आरडाओरडा
केला. पत्नी व मुलगी काय प्रकार आहे पहाण्यास घराबाहेर आले
असताना मुलीच्या तोंडात मारून तिच्या अंगाशी झटापटी करून
फिर्यादींची पत्नी सोडवण्यास गेली असता त्यानाही मारहाण
करून तुझ्या बापाला व भावाला खलास करतो अशी धमकी
देऊन घरासमोरील दुचाकी वाहनांची मोडतोड केली आहे.
त्यानंतर मध्यरात्री २/५० वाजता पुन्हा येऊन फिर्यादी यांचे
घरावर दगडफेक करून घरासमोरील दुचाकी व चारचाकी
वाहनांच्या काचा फोडून नुकसान करून सदर परिसरात दहशत
निर्माण केली.


याबाबत युनिट-३ च्या पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व गुन्हा
पोलिस अभिलेखावरील नितीन सणस व त्याच्या साथीदारांनी
केल्याची माहिती मिळाली. त्यांचा शोध घेत असताना ते
ऍक्टिव्हावरून फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून सणस
व घोडे याना युनिट-३ च्या पोलिसांनी पकडले. परिमंडळ ३ चे
पोलिस उपायुक्तांनी नितीन सणसला पुणे शहर व जिल्ह्यातून २७
नोव्हेंबर २०१८ पासून तडीपार केले आहे. त्याच्यावर याच्याआधी
कोथरूड पोलिस स्टेशन येथे खुनाचा १, खुनाच्या प्रयत्नाचे २,

कोथरूड पोलिस स्टेशन येथे खुनाचा १, खुनाच्या प्रयत्नाचे २,
गंभीर दुखापतीचे ४, दंगा मारामारीचा १, खंडणीचा १, अग्निशस्त्र
जवळ बाळगल्याचा १ असे एकूण १० व गंभीर दुखापतीचा १ व
तडीपार आदेश मोडण्याचा १ असे एकूण १२ गुन्हे दाखल
आहेत.
सदर कामगिरी गुन्हेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे,
उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-३ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उप निरीक्षक संजय गायकवाड, विकास शिंदे, सहायक फौजदार दत्तात्रय गरूड, रोहिदास लवांडे, कोथरूड पोलिस स्टेशनचे हवालदार रमेश उगले यांनी केली आहे.