परवेज शेख निगडी 29ऑक्टोबर रोजी आकुर्डी येथे घडली.येशू मुरुगन दास (वय 45) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे तर पत्नी उर्सुला येशू दास (वय 39, रा. आंबेडकरनगर मशिदीजवळ, देहूरोड), तिचा मित्र भाऊराव राम आरे (वय 24, रा. गणेश कॉलनी, रुपीनगर, तळवडे) तसेच रज्जाक नसरुद्दीन शेख (वय 19), लखन सहदेव कापरे (वय 21 दोघेही रा. महात्मा फुले हौसिंग सोसायटी, ओटास्किम निगडी) अशी आरोपींची नावे आहेत.
माहितीनुसार, मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी आरोपी उर्सुला येशू दास हिने निगडी पोलीस ठाण्यामध्ये आपल्या पतीवर अज्ञात व्यक्तीने वार केल्याची फिर्याद दाखल केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता येशू मुरुगन दास यांच्या गळ्यावर, मानेवर, अंगावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने दास यांना उपचारासाठी पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. आरोपी उर्सुला ही एस बी स्कूलच्या बसवर मागील तीन वर्षांपासून काळजीवाहक म्हणून काम करते. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन चौकशी केली असता सदर बसचा चालक भाऊराव आरे याच्याशी तिचे मैत्रीचे संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी आरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पत्नी उर्सुला हिच्या संगनमताने येशू दास याला 1 लाख 30 हजार रुपयाची सुपारी दिल्याची माहिती समोर आली. भाऊराव आरे याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य दोन आरोपीना ताब्यात घेतले. येशू दास हे घरात झोपलेले असताना रविवारी पहाटे आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याचे कबूल केले.