लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
- Advertisement -


मुंबई, दि. २३ : भारतीय असंतोषाचे जनक आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी गर्जना करून देशवासियांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्वाला पेटवणारे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सामन्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड, संदेश उतेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी विजय शिंदे, अमोल चव्हाण यांनीही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000

प्रविण भुरके/स.सं.

 

 



Source link

- Advertisement -