मुंबई, दि. २० : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व उपस्थित पोलीस अधिकारी व जवानांना सद्भावना प्रतिज्ञा दिली.
“जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडवण्याची” प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली. दिवंगत राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी देखील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.
000000
ज.सं.अ लोकभवन









WhatsApp