माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना मंत्रालयात अभिवादन

- Advertisement -


मुंबई, दि. २० : माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्त मंत्रालयात आज प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव संतोष कुमार यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याची प्रतिज्ञा घेतली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव भरत गावडे, उपसचिव समृद्धी अनघोळकर अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड, दत्तात्रय शिंदे, कक्ष अधिकारी सारिका पाटील, सहायक कक्ष अधिकारी शिंदे, संदेश उत्तेकर, अमोल चव्हाण, मंत्रालय संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००

प्रविण भुरके/ वि.सं.अ



Source link

- Advertisement -