Home गुन्हा हृदयद्रावक! मुलींचे मृतदेह रस्त्यावर पडलेले; जवळूनच जाणाऱ्या वडील आणि भावाला समजलेच नाही

हृदयद्रावक! मुलींचे मृतदेह रस्त्यावर पडलेले; जवळूनच जाणाऱ्या वडील आणि भावाला समजलेच नाही

0

नवी दिल्ली : ग्रेटर नोएडा येथील ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेसवेवर रविवारी एकभीषण अपघात झाला. या अपघातात मिठ्ठेपूरला राहणाऱ्या यासिन यांचे कुटुंबातील तीन मुलींचा मृत्यू झाला. ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी दुसऱ्या गाडीत यासिन आणि त्यांचा मुलगा मोईन मागून येत होते. हा अपघात घडला तेव्हा रस्त्यावर मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली होती. मात्र, गर्दी पाहून मागून गाडीने आलेले वडील आणि भाऊ थांबले नाहीत. ते पुढच्या प्रवासासाठी निघाले. रस्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या मुली रस्त्यावर पडलेले. मात्र, गर्दीमुळे न कळाल्याने मागून गाडीने येणाऱ्या वडील आणि भावांना समजलेच नाही. यासिन यांचे कुटुंबीय एका कार्यक्रमाहून घरी परतत असताना हा अपघात झाला.

यासिन यांचा मुलगा मोईन यांनी सांगितले की, यासिन यांनी आपल्या लाडक्या मुलींना कधी एक बोटही लावले नव्हते. मात्र, भीषण अपघातात सुमाइला, रिहाना आणि अक्शा या तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनाला छेदणारी गोष्ट म्हणजे काही कौटुंबिक कारणास्तव कार्यक्रमासाठी शाहीन आणि शाहिना या दोन बहिणी कार्यक्रमासाठी गेल्या नव्हत्या. कार्यक्रमासाठी पुढे इको गाडीने निघालेली सुमाइल ९ इयत्तेत शिकत होती, तर रिहाना आणि अक्शा या सुद्धा शिकत होत्या. तसेच गाडीतून प्रवास करणारे काका शाळेत शिक्षक होते. या सर्वांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पेरिफेरल एक्स्प्रेसवेवरील सीसीटीव्ही कॅमेरे हे टोल प्लाझा येथे लावण्यात आले आहेत. हे सीसीटीव्ही तपासले असून या अपघाताबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. मात्र अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला होता. सीसीटीव्हीत माहिती कैद न झाल्याने पोलिसांना आरोपी चालकाचा शोध लावण्यास अडचण निर्माण झाली आहे.