परवेज शेख अक्षय कुमार लवकरच अॅक्शनपॅक्ड ‘सूर्यवंशी’ चित्रपटात दिसणार आहे. अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी करत आहे. पण नुकतंच अक्षय आणि रोहितचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात ते दोघे एकमेकांसोबत मारामारी करताना दिसत आहेत. इतकच नाही तर, त्या दोघांचे भांडण सोडवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
अक्षय आणि रोहितच्या या भांडणाचा व्हिडिओ स्वतः अक्षयने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओत रोहित आणि अक्षय भांडण करताना दिसत आहेत, पण हे भांडण खरे नसून खोटे आहे. व्हिडिओच्या सुरुवातील सूर्यवंशीमधील अक्षयची हिरोइन कॅटरीना कैफ दिसते, त्यानंतर अक्षय आणि रोहितमध्ये भांडण सुरू होते आणि पोलिस त्यांना सोडवतात. व्हिडिओ शेअर करताना अक्षने लिहीले, “ब्रेकिंग न्यूज- एक ऐसा झगड़ा, जो आपका दिन बना सकता है.”अक्षयचा आगामी ‘सूर्यवंशी’चित्रपट एक अॅक्शनपट आहे. या चित्रपटाला करण जौहर आणि रोहित शेट्टी मिळून प्रोड्यूस करत आहेत. धर्मा प्रोडक्शन आणि रोहित शेट्टी पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत बनत असलेला हा चित्रपट पुढच्या वर्षी 27 मार्चला रिलीज होत आहे. चित्रपटात अक्षयसोबत कैटरीना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. तसेच, एका सीनमध्ये रणवीर सिंह आणि अजय देवगनचा कॅमिओ आहे.