Home शहरे कोल्हापूर 3 लाख 68 हजार 560 चा मुद्देमाल जप्त एकास अटक; राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई

3 लाख 68 हजार 560 चा मुद्देमाल जप्त एकास अटक; राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई

0

परवेज शेख गोवा मद्यासह 3 लाख 68 हजार 560 चा मुद्देमाल जप्त
एकास अटक; राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 36 बॉक्स बेकायदेशीर वाहतूक करताना विजयकुमार विलास बनसोडे (व.व. 27, मिठारी मळा, बालिंगा रोड, पाडळी खुर्द) याला आज राज्य उत्पादन शुल्क पथकाने अटक केली. या कारवाईत एकूण 3 लाख 68 हजार 560 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


शहरातील फुलेवाडी जकात नाक्याजवळ पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा फोर्स वाहनातून (क्र.एमएच 13 एन 3093) गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या रॉयल स्टॅग व्हीस्की 750 मिलीच्या 24 बाटल्या, रॉयल स्टॅग बॅरेल व्हीस्की 750 मिलीच्या 24 बाटल्या, मॅकडॉल नं. 1 व्हीस्की 750 मिलीच्या 204 बाटल्या, इंपेरीयल ब्ल्यू व्हीस्की 750 मिलीच्या 60 बाटल्या, रॉयल चॅलेंज व्हीस्की 750 मिलीच्या 36 बाटल्या, मॅकडॉल नं. 1 सेलिब्रेशन ड्रम 750 मिलीच्या 24 बाटल्या, ओल्ड मंक रम 750 मिलीच्या 24 बाटल्यांचे 36 बॉक्स बेकायदेशीररित्या वाहतूक करताना संशयित आरोपी श्री. बनसोडे यांच्यावर कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क पथकाने त्यांच्यावर मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 नुसार अजामिनपात्र गुन्हा दाखल केला आहे.


सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील व उप अधिक्षक बापूसो चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक यु.डी. शिंदे, दुय्यम निरीक्षक ए.के. कांबळे, पी.सी. शेलार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एम. आर. लाडके व जवान एस. जे. मोरे,जी.बी. सानप, श्रीमती एस. डी. देसाई, साजिद मुल्ला यांनी केली.