Home शहरे जळगाव एरंडोलच्या गोपीगोल्ड स्कूल मध्ये रंगले स्नेहसंमेलन

एरंडोलच्या गोपीगोल्ड स्कूल मध्ये रंगले स्नेहसंमेलन

0

प्रतिनिधी – एरंडोल येथील
ग्रामीण उन्नती मंडळ संचलित ,गोपी गोल्ड इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये जल्लोष तालसुरांचा 2020 हे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न झाले .


व्यासपीठावर खा.उन्मेष पाटील, जि. प .च्या माजी अध्यक्षा उज्वला पाटील ,लोक नियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी,नगरसेवक डॉ. सुरेश पाटील ,संस्था अध्यक्ष सचिन विसपुते ,समाधान पाटील ,गट शिक्षण अधिकारी व्ही .एच. पाटील ,डॉ .राजेंद्र देसले ,भिका कोळी ,माध्यमिक विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका अंजुषा विसपुते,गोपी गोल्ड च्या मुख्याध्यापिका वाडगावकर ,सुवर्णा बाळापुरे उपस्थित होते.स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलागूण सादर करून उपस्थितांची मने जिंकली .तसेच शालेय स्थारावरील उपक्रम, स्पर्धा, स्नेहसंमेलनातील गुणवंत विध्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मुलांवर संस्कार, संस्क्रुती तसेच ऍक्टिव्ह राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार उन्मेष पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली तेलंगे व वडगावकर मॅडम,तर आभार संदीप सपकाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी – एरंडोल येथील गोपीगोल्ड शाळेतील चिमुकले नृत्य सादर करीत असतांना.