Home शहरे अहमदनगर अहमदनगर । महाविकास आघाडीला धक्का, महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाच्या पल्लवी जाधव यांचा दणदणीत विजय

अहमदनगर । महाविकास आघाडीला धक्का, महापालिका पोटनिवडणुकीत भाजपाच्या पल्लवी जाधव यांचा दणदणीत विजय

0

अहमदनगर:महापालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसला असून भाजपाचे महापौर बाबासाहेब वाकळे प्रभागात वर्चस्व राखण्यात पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत. मनपाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महापालिकेच्या प्रभाग 6 अ च्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी अवघे 31 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत 4 हजार 237 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. या जागेसाठी भाजपाच्या पल्लवी जाधव आणि शिवसेनेच्या अनिता दळवी यांच्याध्ये सरळ लढत होती. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रभागातील ही रिक्त जागा असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पहिल्या फेरीपासूनच भाजपाच्या पल्लवी जाधव यांनी मोठी आघाडी घेतली होती. अखेर भाजपच्या जाधव यांना 2915 मते घेत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या. दळवी यांना 1203 तर नोटाला 119 मते मिळाली.