Home ताज्या बातम्या भाजपा दिल्लीत का पराभूत झाला? पाच प्रमूख कारणे

भाजपा दिल्लीत का पराभूत झाला? पाच प्रमूख कारणे

0

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा 2020 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल जवळपास हाती आलेला आहे. त्यानुसार आम आदमी पक्षाला 63 तर भाजपला केवळ सात जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या मनोज तिवारी यांच्यासारखे आक्रमक नेते भाजपा दोन तृतीयांश बहुमत मिळवेल असे करत असलेले दावे फोल ठरले आहेत. प्रत्यक्षात कॉंग्रेस आणि भाजपाचे या निवडणुकीत पानिपत झाले आहे.

भाजपाच्या पराभवाची पाच प्रमुख कारणे

1) स्थानिक मुद्दे सोडून राष्ट्रीय मुद्यांवर प्रचार

राष्ट्रीय सुरक्षा, सुधारीत नागरिकत्व कायदा (का), राष्ट्रीय लोकसंख्या सुची (एनआरसी) या मुद्‌द्‌यांभोवतीच भारतीय जनता पक्षाचा प्रचार केंद्रीभूत राहिला. तर आपचा प्रचार हा मुख्यत: स्थानिक मुद्यांवर राहीला. त्यात प्रामुख्याने मोफत वीज, पाणी अणि दिल्लीतील शाळांमध्ये सुविधा वाढवण्यावर प्रचारात भर दिला. या लहान मुद्यांचा विजय झाल्याचे निकालाने स्पष्ट झाले आहे. भावनिक मुद्दे जनतेच्या रोजच्या प्रश्‍नांवर मात करू शकत नाहीत, हेही स्पष्ट झाले.

2) मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा अभाव

मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडे एकही चेहरा नव्हता. त्यावरही आपकडून जोरदार हल्ला करण्यात आला. मोठा नेता नसल्याने उमेदवारांच्या व्यक्तीगत प्रतिमेवर पक्ष लढत राहीला. त्याचा पुरेपुर फायदा आपने उठवला. भाजपाने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे मी त्यांना आवाहन करतो. मी त्यांच्याशी कोठेही सार्वजनिक रित्या वाद करण्यास तयार आहे, असे विधान केजरीवाल यांनी केले. त्यानंतर आपने केजरीवाल विरूध्द कोण? ही प्रचार मोहीम राबवली. त्यात भाजपा बॅकफूटवर गेला. त्यांना मोदी लाट तारेल असे वाटत होते. पण नेहमी एकच रणनिती वापरून चालत नाही याचा भजपाला विसर पडला.

3) मोदी शहांवर अतिरिक्त अवलंबित्व

स्थानिक लोकप्रिय चेहऱ्याचा अभाव याचा अर्थ भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेवर थोडे जास्तच विसंबून राहीला, असा होतो. आपच्या नेतृत्वाचे अनेक चेहरे होते. त्यांचा प्रतिवाद भाजपाच्या स्थानिक नेत्यांना करता आला नाही.

4) राष्ट्रीयत्वाच्या मुद्दा ताणल्याचा परिणाम

भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीयत्वाचा मुद्दा फारच ताणून धरला. त्यामुळे पक्षाकडे कोणतेही अधिक मतदार आकर्षित झाले नाही. हिंदुत्वाकडे झूकणारे राष्ट्रीयत्व दिल्लीकरांना फारसे रुचले नाही. त्याबाबतची चर्चा सखोल घडवण्यात पक्षाला अपयश आले. स्थानिक मुद्यावर तर भाजपा बोललाच नाही. त्यामुळे ज्या मुद्यावर धोरणावर निवडणुका लढवल्या जात होत्या, त्याचा उल्लेखही पक्षाच्या प्रचारात नव्हता. राष्ट्रियत्वाचा मुद्दाही त्यापेक्षा अधिक राष्ट्रद्रोहाच्या भोवतीच गुंफला गेला होता.

5) शाहीनबाग गोळीबार चालला नाही

शाहीनबाग येथे सुरू असणारी निदर्शने निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी आणण्यात भाजपाला यश आले. त्याविरोधात आक्रमक प्रचार करून हिंदुमताचे ध्रुविकरण करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. आंदोलनकर्त्याला गोळीमारा किंवा त्यांना शॉक लागेल असल्या वक्तव्याला दिल्लीकरांनी भीक घातली नाही. भअजपाचा हा प्रचार समाजात फुट पाडणारा आहे,असे झालेले आरोप अधिक प्रभावशाली ठरले. थोडक्‍यात शाहीनबागविरोध आणि गोळी माराच्या घोषणा पराभूत झाल्या.