Home ताज्या बातम्या कुणीही मोर्चा, रॅली, आंदोलन करू नये, इंदुरीकरांचे चाहत्यांना आवाहन

कुणीही मोर्चा, रॅली, आंदोलन करू नये, इंदुरीकरांचे चाहत्यांना आवाहन

0

शिर्डी : समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी या वक्तव्यावरुन हरीभक्त परायन इंदुरीकर महाराज वादात सापडले आहेत. याविषयावरुन इंदुरीकर महाराजांच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसतोय. आता इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या समर्थकांना आवाहन केलं आहे. कोणीही मोर्चा, रॅली, आंदोलन करु नये असं ते म्हणाले आहेत.

‘वारकरी संप्रदाय शांतताप्रिय आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काही करू नये. कायदेशीरपणे आपण बाजू मांडू’, असं इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत. इंदुरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन, समर्थकांना आंदोलन न करण्याचं आवाहन केले. या पत्रकात इंदुरीकर महाराज म्हणाले की, ‘चलो नगर म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. आपण सगळे माझ्यावर प्रेम करणारी भक्त मंडळी आहात. वारकरी संप्रदाय हा शांतताप्रिय आहे. तरी आपणा नम्र विनंती करण्यात येत आहे की, आपण कोणीही, कुठेही, रॅली, मोर्चा, एकत्र जमने, आंदोलन करणे, निवेदन देणे असे काहीही करण्याचा प्रयत्न करु नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहोत. तरी आपण सर्वांनी शांतता राखून सहकार्य करावे ही विनंती’