Home ताज्या बातम्या अजय शिंदे: पुणे विभागात रेशनिंगवरील धान्य मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात

अजय शिंदे: पुणे विभागात रेशनिंगवरील धान्य मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात

 देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे गरीब, रोजंदार आणि हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. बहुतांश गरीब हे रोज कमावून खात असल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब योजना जाहीर केली, ज्यात गरिबांना वाढीव रेशन देण्यात येणार आहे.

पुणे विभागात १ एप्रिल पासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे परंतु लाभधारकांना यासाठी अडचणी येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी याबद्दल पुणे विभागाच्या पुरवठा अधिकार्यांना निवेदन दिले आहे. यात त्यांनी लाभार्थींना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत मागणी केली आहे या अडचणी सोडवून त्यांना लवकरात लवकर रेशन उपलब्ध करून द्यावे.

मनसेने आपल्या पत्रकात गरीब लोकांसाठी रेशन जाहीर केल्याबद्द्ल केद्र सरकारचं कौतुक केलं आहे तर राज्य सरकारने अशी कोणतीही घोषणा न केल्याच म्हटलं आहे. तसेच रेशन वाटप प्रक्रियेत गोंधळाची परिस्थिती असून याबाबत लवकरात लवकर सुसूत्रता आणावी , लाभार्थी कोण हे स्पष्ट करावं आणि रेशन दुकानदारांना स्पष्ट सूचना देऊन लाभार्थींना रेशन द्याव अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.