Home शहरे जळगाव बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे श्री परशुराम जयंती साजरी

बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे श्री परशुराम जयंती साजरी

0

भगवान विष्णूचे सहावे अवतार श्री परशुराम यांच्या जयंतीच्या निमित्ताने संजय पाठक दिपक पिले व सतीश जोशी यांचे हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गजेंद्र कुलकर्णी व उदय कुलकर्णी यांनीदेखील प्रतिमेचे पूजन केले.


द्वितीय सत्रात संजय पाठक यांच्या यज्ञ शाळेत शांतीपाठ करण्यात आला संजय पाठक दीपक पिले देवेंद्र उपासनी मयुरेश कुलकर्णी विश्वास तांबे मोगु जोशी महाराज यांनी सुरक्षित अंतराचे नियम पाळून वेदमंत्र घोष केलेत.


जयंती उत्सवाच्या तृतीय सत्रात कोरोना महामारी च्या दृष्ट कालावधीत स्वतःचे प्राण पणाला लावून संपूर्ण देश घरी बसलेला असताना स्वतःच्या कुटुंबा ची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असणारे कुटीर रुग्णालयातील डॉक्टर्स नर्सेस स्वच्छता कामगार सेवक रुग्णवाहिका चालक तसेच संपूर्ण पोलीस दल नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी तसेच घरोघर जाऊन अन्नाचे वितरण करणारे, सफाई कामगार यांचा श्रीफळ व नॅपकिन देऊन सत्कार करण्यात आला.


पोलीस निरीक्षक श्रीयुत लीलाधर कानडे साहेब व स्टाफ, वैद्यकीय अधिकारी श्री योगेश साळुंखे तसेच सुनील पारोचे यांचा सत्कार संजय पाठक यांनी केला तसेच नर्सेस यांचा सत्कार सौ. निशा पाठक व मनीषा सोहनी यांनी इतर स्टाफ कर्मचारी सफाई कामगार रुग्णवाहिका चालक तसेच इतर पोलीस बंधू यांचा सत्कार श्री दीपक पिले गिरीश पाठक, देवेंद्र उपा सनी यांनी केला.

महामारी निर्मूलनासाठी उद्या संपूर्ण ब्रह्मवृंद आपल्या परिवारासह आपल्या घरी भिन्नभिन्न अनुष्ठान करणार आहेत यात दुर्गासप्तशतीचे पाठ विष्णुसहस्त्रनाम महामृत्युंजय व आपद्उध्दारण मंत्रजप सहस्त्रावर्तन, रुद्राभिषेक तसेच भगवान परशुराम गायत्री इत्यादींचे अनुष्ठान करण्यात येईल
याच निमित्ताने काल समाजभूषण व माजी उपनगराध्यक्ष मंगेश तांबे यांनी समाजातील अत्यंत गरीब अशा कुटुंबास वैयक्तिक मदत करून प्रसिद्धी न देण्या ची सूचना दिली याचप्रमाणे गजेंद्र कुलकर्णी हेमंत संत ज्ञानेश्वर पुराणिक,प्रकाश मोहरीर धनेश पाठक, मनिषा सोहनी इत्यादींनी किराणा साहित्याचे वितरण केले. समाजातील समस्त ज्येष्ठ व श्रेष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच अनेकांचे अप्रत्यक्ष सहकार्य लाभले