लष्करी जवानांकडून कोरोना योद्ध्यांना सलाम

- Advertisement -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) येथील कोरोना योद्ध्यांना लष्कराच्या जवानांकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, घाटीतील डॉक्टर यांच्यासह ब्रिगेडियर यू एस आनंद , अजय लांबा, हरमिंदर सिंग, आर के सिंग या लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

डॉ येळीकर म्हणाल्या, संकट आहे पण समाजातून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे लढण्यासाठी बळ मिळत आहे. जवानांकडून प्रत्येकाला कोरोनाच्या या लढ्यात लढण्याला प्रोत्साहन, मान देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येकजण यात आपले योगदान देत आहे. त्याला जवानांचा सलाम असल्याचे ब्रिगेडियर यू एस आनंद म्हणाले. माध्यम समन्वयक डॉ अरविंद गायकवाड यांच्याकडून माहिती त्यांनी जाणून घेतली.

यावेळी डॉ मोहन डोईबळे, डॉ सुधीर चौधरी, डॉ सुरेश हरबडे, डॉ अरविंद गायकवाड, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अनिल धुळे, डॉ. अमरनाथ अवरगावकर, डॉ सोनल येळीकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -