Home ताज्या बातम्या लोकलसेवा सुरु, फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी

लोकलसेवा सुरु, फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी

मुम्बई :- शफीक शेख

राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आजपासून (15 जून) सुरु झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल सेवा बंद होती.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अप-डाऊन अशा लोकलच्या 346 फेऱ्या असतील अशी माहिती आहे. सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांना मात्र या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. ही उपनगरीय सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे. शासकीय किंवा खाजगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचं ओळखपत्र पाहूनच त्यांना या ट्रेनमधून प्रवासाचं तिकीट मिळेल, तसंच प्रवास करता येईल.