Home शहरे मुंबई “उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण दिलं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट”

“उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण दिलं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट”

मुंबई :उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण दिलं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते विधानसभेत बोलत होते.मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेली 25 वर्ष जो लढा सुरू होता त्या लढ्याला यश आलं आहे. मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा पूूर्ण अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष मंजूर असून 50 टक्के आरक्षणाची मर्यादा अपवादात्मक परिस्थितीत ओलांडता येते, असं फडणवीस म्हणाले दरम्यान , मराठा आरक्षणाचा निकाल न्यायालयाने दिल्यावर गावागावात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.