Home बातम्या आंतरराष्ट्रीय West Bengal Poll: ‘दीदी ओ दीदी’ नाही ‘जिओ दीदी’; अखिलेश यांचा मोदींना टोला

West Bengal Poll: ‘दीदी ओ दीदी’ नाही ‘जिओ दीदी’; अखिलेश यांचा मोदींना टोला

0
West Bengal Poll: ‘दीदी ओ दीदी’ नाही ‘जिओ दीदी’; अखिलेश यांचा मोदींना टोला

[ad_1]

हायलाइट्स:

  • पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला निर्णायक आघाडी
  • ‘दीदी ओ दीदी’ला जोरदार प्रत्यूत्तर
  • अखिलेश यादव यांनी साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीचं चित्रं आता जवळपास स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळालाय. पश्चिम बंगालच्या निकालानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक ट्विट करत ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच, अपमानजनक कटाक्ष टाकत ‘दीदी ओ दीदी’ म्हणणाऱ्यांना जनतेनं दिलेलं हे दमदार प्रत्यूत्तर आहे, असं म्हणत अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. सोबतच त्यांनी ‘दीदी जिओ दीदी’ असा नवा हॅशटॅग आपल्या ट्विटसोबत जोडलाय.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टसोबत ममता दीदींसोबतच आपला एक जुना फोटोही आठवण म्हणून शेअर केलाय. या फोटोत ममता बॅनर्जी यांना आनंदाने फुले देताना ते दिसत आहेत. तर ममता बॅनर्जी या अत्यंत प्रेमाने त्यांच्या गालावरून हात टेकवताना दिसत आहेत.

West Bengal Poll: पश्चिम बंगालच्या विजयासाठी शरद पवारांकडून ममता ‘दीदी’चं अभिनंदन!
LIVE : पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक २०२१ निकाल
‘पश्चिम बंगालमध्ये भाजपचं घृणेचं राजकारण हाणून पाडणाऱ्या जागरुक जनता, झुंजारून ममता बॅनर्जीजी आणि तृणमूल काँग्रेसला समर्पित असणाऱ्या नेत्या-कार्यकर्त्यांचं अभिनंदन’, असं अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

सोबतच, ‘भाजपवाल्यांकडून एका महिलेवरच्या अपमानजनक कटाक्ष ‘दीदी ओ दीदी’ला जनतेनं दिलेलं हे जोरदार प्रत्यूत्तर आहे. #दीदी_जिओ_दीदी’ असं म्हणत अखिलेश यादव यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकी दरम्यान आपल्या अनेक प्रचारसभांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दीदी ओ दीदी’चा सूर लावलेला पाहायला मिळाला होता.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ चा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला. अंतिम निकाल हाती येणं बाकी असलं तरी सध्या राज्यात तृणमूल काँग्रेसनं बहुमताचा आकडा (१४७) सहजच पार करत २०२ जागांवर आघाडी मिळवलेली दिसतेय. तर भाजप ८६ जागांवर आघाडीवर आहे.

LIVE Assembly Elections 2021: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत
kerala assembly election 2021 result : श्रीधरन यांची ‘मेट्रो’ सुस्साट; पलक्कडमध्ये आघाडीवर

[ad_2]

Source link