भारतातून ‘या’ देशात प्रवेश केल्यास होणार तुरुंगवासाची शिक्षा!

भारतातून ‘या’ देशात प्रवेश केल्यास होणार तुरुंगवासाची शिक्षा!
- Advertisement -


कॅनबरा: जगभरातील काही देशांमध्ये करोना संसर्गाचा जोर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. भारतातील करोना परिस्थितीवर इतर देशांचे लक्ष आहे. भारतातून करोनाचा आपल्या देशात येऊ नये यासाठी काही देशांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियाच्या विमानाचा एक कर्मचारी करोनाबाधित आल्यानंतर विमान पुन्हा विना प्रवासी दिल्लीत पाठवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात १४ दिवस वास्तव्य केलेल्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन नागरिकांचाही समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाने मागील १४ दिवसांपासून भारतात असलेल्या आपल्या नागरिकांना देशात परतण्यावर अनिश्चित बंदी लागू केली आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षाही जाहीर करण्यात आली आहे. पाच वर्षांचा कारावास किंवा मोठ्या रकमेचा दंड भरावा लागेल, असा इशारा सरकारने दिला आहे. ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी सांगितले की, भारतात संसर्ग बाधित होऊन ऑस्ट्रेलियात परतलेल्या अनेक नागरिकांना सध्या विलगीकरणात राहावे लागत आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात संसर्ग नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने हा आदेश दिल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा: शक्य तेवढ्या लवकर भारत सोडा; अमेरिकेची नागरिकांना सूचना

वाचा:ब्रिटनकडून भारतासाठी ‘ऑक्सिजन फॅक्टरी’; एका मिनिटात तयार होणार ‘इतका’ ऑक्सिजन

दरम्यान, याआधी भारतातून येणाऱ्यांपैकी अनेकजण करोनाबाधित आढळत होते. भारतातील करोना चाचणीवर ऑस्ट्रेलियात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. भारतातून करोना चाचणी करून येणाऱ्यांची राज्यात पु्न्हा चाचणी केल्यानंतर ते करोनाबाधित असल्याचे समोर येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतात होणारी करोना चाचणी त्रुटीपूर्ण असावी अथवा विश्वास करण्याजोगी नसल्याचे पश्चिम ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर मार्क मॅक्गोवन यांनी म्हटले.

वाचा:करोनाचे महासंकट: युनिसेफकडून भारतीयांच्या ‘श्वासा’ला बळ!

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशांना प्रवेश बंदी

मागील आठवड्यात, सिडनीहून उड्डाण घेणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील क्रू पैकी एका सदस्याला करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी या विमानात प्रवाशांना बसू दिले नाही. त्यानंतर हे विमान फक्त सामानांसह दिल्लीत दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली-सिडनी उड्डाणापूर्वी दिल्लीत विमानाच्या सर्व कर्मचाऱ्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला होता.



Source link

- Advertisement -