[ad_1]
नवी कास्ट आणि कमी बजेट असलेली ही वेब सीरिज मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये रिलीज झाली होती. ही वेब सीरिज एवढी धमाकेदार होती की, प्रेक्षक सुद्धा हादरून गेले होते. वेब सीरिजचं बजेट कमी असलं तरीही कथा मात्र तेवढ्याच ताकदीची असल्यानं या वेब सीरिजला लोकांनी डोक्यावर घेतली होती. आता या वर्षी या वेब सीरिजचा दुसरा सीझन येण्याची शक्यता आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
शी (She) सीझन २
दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी २०२०मध्ये ‘शी’ (She)या वेब सीरिजमधून ओटीटी डेब्यू केला होता. ही त्यांची पहिली वेब सीरिज होती. आता लवकरच या वेब सीरिजचा दुसरा सीझन येणार आहे. ही एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची कथा आहे. जी ड्रग्स माफियांना पकडण्यासाठी मदत करत असते आणि त्यासाठी ती वेश्या असल्याचं नाटक करते.
कोटा फॅक्ट्री २
टीव्हीएफवरील वेब सीरिज कोटा फॅक्टरी एक अशी वेब सीरिज आहे जी तुम्ही कुटुंबासोबत बसून पाहू शकता. लवकरच या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसरा सीझन टीव्हीएफसोबतच नेटफ्लिक्सवरही रिलीज होणार आहे.
दिल्ली क्राइम सीझन २
ज्यांनी दिल्ली क्राइमचा पहिला सीझन पाहिला आहे त्यांना माहीत आहे की, ही वेब सीरिज किती दमदार आहे. ही सर्वाधिक प्रेक्षक संख्या मिळालेली वेबसीरिज ठरली होती. या वेब सीरिजमध्ये शेफाली शाह, रसिका दुग्गल, राजेश तैलंग, आदिल हुसैन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची तयारी सुरू झाली आहे.
फायन्डिंग अनामिका
या वेब सीरिजमधून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओटीटी पदार्पण करत आहे. हा एक थ्रीलर ड्रामा असणार आहे. याची कथा एका सुपरस्टार महिलेवर आधारित आहे. जी एक दिवस अचानक गायब होते. ज्याबद्दल कोणालाच काही माहीत नसतं.
[ad_2]
Source link