हायलाइट्स:
- दहशतवादी ‘अल बद्र’ या दहशतवादी संघटनेशी संबंधीत
- चकमकीत तीन दहशतवादी ठार
- एकानं स्वीकारला आत्मसमर्पणाचा मार्ग
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील कानिगाम भागात अतिरेकी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर या परिसराला घेराव घालत शोध मोहीम राबवण्यात आली.
‘अल बद्र‘ या दहशतवादी संघटनेच्या चार नवीन स्थानिक दहशतवादी इथे उपस्थित असल्याचं समजताच सुरक्षा दलानं अत्यंत संयम राखत आत्मसमर्पण दहशतवाद्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दहशतवाद्यांनी शरण येण्यास नकार देत सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यांनी सुरक्षा दलावर एक ग्रेनेडही फेकले. याला सुरक्षा दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आणि त्यानंतर दोन्ही बाजुंकडून चकमकीला सुरुवात झाली.
चकमकीदरम्यान एका दहशतवाद्यानं सुरक्षा दलासमोर शरणागती पत्करली त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र इतर तीन जण चकमकीत ठार झाले. आत्मसमर्पण करणाऱ्या दहशतवाद्याचं नाव तौसिफ अहमद असल्याचं समजतंय.