Home क्रीडा धक्कादायक!!! ‘या’ धडाकेबाज भारतीय खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा

धक्कादायक!!! ‘या’ धडाकेबाज भारतीय खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज फलंदाज अंबाती रायडू याने एकाएकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या घोषणेने चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड न झाल्याने तो कमालीचा नाराज होता. त्याने त्याची नाराजी बोलूनही दाखवली होती.

विश्वचषक स्पर्धेत शिखर धवन आणि विजय शंकर जखमी झाल्याने अंबाती रायडूला संधी मिळेल, असं अनेक जणांना वाटतं होतं. परंतू त्याला संधी मिळाली नाही. आयसीसीदेखील याने अवाक झाली होती.

अंबाती राडूने भारतासाठी अनेक मॅचविनिंग खेळी केल्या आहेत. तसेच त्याने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंगकडून खेळताना अनेक मह्त्वपूर्ण लढतींमध्ये आपले मोलाचे योगदान दिले आहे.