धक्कादायक : सहा महिन्यात २४ हजार अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना

- Advertisement -

नवी दिल्ली : देशातील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो (स्वत: दखल घेत) याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाल्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वतः एखादे प्रकरण दाखल करण्याची कदाचित ही पाहिलीच वेळ आहे.

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात एक खटला सुनावणीला आला होता. स्वतःच सुनावणीला आलेल्या या खटल्याचे जनहित याचिकेत रुपांतर करुन घेतले गेले. तसेच ज्येष्ठ वकील व्ही. गिरी यांची न्यायालयाने सल्लागार आणि पक्षकार म्हणून नियुक्ती केली. त्यांना येत्या सोमवारपर्यंत याबाबतची संपूर्ण माहिती सादर करण्यास सांगितले आहे.

गत सहा महिन्यात देशात २४ हजार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत, अशी माहिती सर्वोच्च न्यायालायने याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिली. अशा प्रकरणांच्या सुनावणींसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्याचा विचारही सर्वोच्च न्यायालय करत आहे. ही सामान्यांसाठी अत्यन्त महत्वाची बाब आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३० जूनदरम्यान जवळपास २४ हजार २१२ अल्पवयीन मुलींवर बलात्कारांच्या घटनांची नोंद झाली आहे. यातील ११ हजार ९८१ प्रकरणांची चौकशी सुरु आहे. तर १२ हजार २३१ प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली असून आरोपी देखील अटकेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने समाज हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. यामुळे गुन्हेगारीवर काहीशा प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल.

- Advertisement -