पुणे : कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिनेश शिंदे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दि.१३ जुलै रोजी १०.३० वा. काही व्यक्ती हॉटेल मीट येथे पैशावर पोकर नावाचा जुगार खेळत आहेत. सदर बातमीवरून मा. श्री. बच्चन सिंग सा., पोलीस उप आयुक्त, परि.२, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री मदन बहाद्दरपुरे, अधिकारी, स्टाफ व दोन पंचासह हॉटेल मीट येथे जावून छापा टाकला. रूम नं. ३०८ मध्ये (१) आशिष सतीश मित्तल, रा. विमानगर, पुणे (३) अषम मदन गुप्ता, रा. विमाननगर, पुणे (३) आदित्य सूर्यप्रकाश अगरवाल, रा. औंध, पुणे (५) आशिष नंदकिशारे, अगरवाल, रा, मार्केटयार्ड, पुणे (५) गौरव सूरज अगरवाल, रा, ऊंड्री, पुणे (६) अभिषेक संतोष अगरवाल, रा, सोपानबाग, पुणे (७) सुरज सुशील गोयल, रा. मार्केटयार्ड, पुणे (८) गोविंद लक्ष्मीकांत पारेख, रा. एन.आय.बी.एम. रोड, पुणे (९) जरोश मोहन गुप्ता, रा. कल्याणीनगर, पुणे हे सर्व रूममधील बेडवर गोलाकार बसून पैशावर पोकर नावाचा जुगार खेळताना सापडले. सदर ठिकाणी जुगार खेळण्यासाठी जुगाराची साधने मिळून आली असून, त्यात पोकर रेंज नावाचे जुगाराचे साहित्य असलेली आयताकृती पेटी तसेच बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी तीन हुक्का पॉट व रोख रक्कम असा एकूण ३२,४९० रु. चा माल मिळाला. तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला. वरील नऊ व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे व जुगार खेळणाच्या नऊ व्यक्तींना या गुन्हयात अटक करण्यात आले आहे. वरील व्यक्ती या पुण्यातील व्यापारी आहेत. तसेच हॉटेल मीटचे मालक व मॅनेजर यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई चालू आहे.वरील कारवाई ही मा. श्री. बच्चन सिंग सो., पोलीस उप आयुक्त, परि.२, पुणे शहर मा. डॉ. प्रीती टिपरे, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. मदन बहाद्दरपुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.गणेश माने, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण लोंढे व पोलीस कर्मचारी दिनेश शिंदे, संदीप गायकवाड, अमोल सोनावणे, रियाज शेख, विनोद साळुंके, शरद वाघमारे, अशोक हरीहर यांनी केलेली आहे.
कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा
- Advertisement -