हायलाइट्स:
- कन्नड अभिनेता विजय संचारी यांचे निधन
- विजय यांचा ब्रेनडेड झाल्याने कुटुंबियांना अवयवदानाचा घेतला निर्णय
- विजय यांचा शनिवारी रात्री झाला होता अपघात
विजय यांचा भाऊ सिद्धेश यांनी सांगितले की, ‘विजय यांच्या मेंदूचे कार्य बंद झाले होते. त्यामुळे आम्ही त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. समाजासाठी काहीतरी करण्याची संचारी विजयची कळकळ होती. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे.’
दरम्यान, विजय यांचा शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अपघात झाला. ते बाईकवर पाठीमागे बसले होते. पावसामुळे रस्ते ओले झाले होते त्यामुळे त्यांची बाईक घसरली आणि ते खाली पडले. यावेळी विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, २०१५ मध्ये ‘नानु अवानल्ला अवालु’ या सिनेमातून संचारी विजय यांनी आपली ओळख निर्माण केली. ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अॅक्ट १९७८ या सिनेमात त्यांना अखेरचे पाहण्यात आले होते.
लॉकडाउनमध्ये विजय यांनी लोकांच्या मदतीसाठीही हात पुढे केला होता. यूसायर या टीमशी जोडून घेत ते करोना संक्रमित लोकांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत होते. ही माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांनाही दिली होती.