हायलाइट्स:
- ‘बेल बॉटम’ २७ जुलैला होणार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित
- निर्मात्याच्या सांगण्यावरून मानधन कमी केल्याच्या होत्या चर्चा
- अक्षयने ट्विट करत केलं चर्चांचं खंडन
TRPच्या स्पर्धेत ‘देवमाणूस’ चौथ्या स्थानावर ; ‘ही’ मालिका ठरली अव्वल
अक्षयचे अनेक चित्रपट सध्या प्रदर्शनासाठी तयार आहेत. त्यासोबत अक्षय आणखीही काही चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. अक्षयचा ‘बेल बॉटम’ येत्या २७ जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. परंतु, या चित्रपटासाठी अक्षयने आपल्या मानधनात कपात केल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिनींकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, आता अक्षयने एक ट्वीट करत या अफवा असल्याचं म्हटलं आहे. अक्षय एका चित्रपटासाठी ४० ते ५० कोटींच्या घरात मानधन घेतो. परंतु, अक्षयने चित्रपट निर्माता वासू भगनानी यांच्या सांगण्यावरून आपलं मानधन ३० कोटी केल्याचं सांगण्यात आलं होतं. या बातम्या खोट्या ठरवत अक्षयने ट्वीट करत म्हटलं, ‘अशा खोट्या बातम्या तयार करताना कसं वाटतं?’
अक्षयसोबत वासू भगनानी यांनीही या चर्चा खोट्या असल्याचं सांगत ट्वीट केलं. त्यांनी म्हटलं, ‘या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाहीये.’ ‘बेल बॉटम’ चित्रपटात अक्षयसोबत वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी मुख्य भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट ८० च्या दशकातील गुप्तहेरांवर आधारित आहे. अक्षय या चित्रपटात एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. यापूर्वी अक्षयचा ‘बेल बॉटम’ आणि ‘सूर्यवंशी’ स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. परंतु, ‘अक्षयचा ‘बेल बॉटम’ येत्या २७ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
हर हर महादेव म्हणत अजिंक्य देव यांनी केलं छोट्या पडद्यावर पुनरागमन