विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात विराट आणि अनुष्का हाताच्या एका बोटावर बॅट बॅलेन्स करताना दिसत आहे. अनुष्का अतिशय स्किलफुली हे बॅलन्स करत आहे तर विराटला बॅट बॅलन्स करण्यासाठी मेहनत करावी लागत आहे.
दोन वेगळ्या व्हिडीओंचा कोलाज करून हा व्हिडीओ शेअर केला आहे. एका व्हिडीओमध्ये अनुष्का दिसत आहे तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये विराट दिसत आहे. विराटला एका बोटावर बॅटचे बॅलन्स करताना कसरत करावी लागत आहे. तर अनुष्काने आरामात बॅट बॅलन्स केली आहे. दरम्यान बॅट बॅलन्स करत असताना विराट मोबाइलही वापरताना दिसत आहे.
राज आणि मंदिरा बेदीनं प्रॉपर्टीसंदर्भात घेतलेला मोठा निर्णय
व्हिडीओच्या शेवटी विराट चाहत्यांना म्हणतो, ‘चला आता तुम्हीही करा. तुम्हीदेखील हे करून दाखवलं पाहिजे.’ अनुष्काने देखील विराटने शेअर पोस्ट केलेला व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘मी विराटसोबत टका टक बॅट बॅलेन्स चॅलेंज खेळले. खूप धम्माल आली. आता तुम्ही देखील हे चॅलेंज स्वीकारा आणि खेळून दाखवा…’
दरम्यान, वामिकाच्या जन्मानंतर लगेचच अनुष्का सोशल मीडियावर सक्रीय झाली आहे. सध्या विराट, अनुष्का आणि त्यांची मुलगी लंडनमध्ये आहेत. विराट आणि अनुष्का आपल्या लेकीसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत. लंडनमधील एका रस्त्यावर आपल्या लेकीला वामिकाला घेऊन उभ्या असलेल्या अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. अर्थात या फोटोमध्ये फक्त अनुष्का दिसत आहे. बाबा गाडीमध्ये असलेल्या वामिकाचा चेहरा दिसत नाही.