मलायकाता जिममधून निघतानाचा व्हिडिओ छायाचित्रकार विरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये मलायका वर्कआऊट केल्यानंतर बाहेर येताना दिसत आहे. मलायकाचे कपडे पाहून लोकांनी विविध प्रकारच्या टिप्पण्या केल्या आहेत. यातील बहुतांशी कमेन्ट या आक्षेपार्ह आहेत. एका युझरने लिहिले की, ‘हिला कोणी तरी कपडे द्या रे..’

अजून एका युझरने लिहिले की, ‘ती नेहमी अशीच फिरते तिला कोणी तरी कपडे आणून द्या.’ दुसर्या युझरने लिहिले की, ‘खरं सांगायचं तर मला या निरुपयोगी सेलिब्रिटींपेक्षा या पोलिसाबद्दल अधिक आदर वाटतो. माझ्यासाठी हा पोलीस सेलिब्रिटी आहे. अजून एका युझरने कमेन्ट करत सांगितलं की, ‘पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करू नका, नाही तर वाहनांची गर्दी होईल.’

दरम्यान, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही बहुतेक वेळेस आउटिंग आणि पार्टीत एकमेकांशी दिसतात. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी आपलं नातं लपवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. तथापि, या दोघांनी याबद्दल कधीही उघडपणे बोलले नाही.