हायलाइट्स:
- सलमानच्या सांगण्यावरून व्यापाऱ्याने उघडला ‘बिन्ग ह्युमन’ चा शोरूम
- शोरूम साठी मिळालं नाही कोणतंही सामान
- याप्रकरणी सलमानला बजावण्यात आले आहेत समन्स
मुंबईत चंदीगढ,तर नाशिकमध्ये युपी; चित्रपटांच्या सेटसाठी करावी लागतेय तारेवरची कसरत
काय आहे प्रकरण
व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सलमानच्या सांगण्यावरून व्यापाऱ्याने चंदिगढ येथे जवळपास तीन कोटी रुपयांचं ‘ बीइंग ह्युमन ज्वेलरी’ चं शोरूम सुरू केलं. शोरूम सुरू करण्यासाठी स्टाइल क्विंटेट ज्वेलरी यांच्यासोबत एक करार देखील केला होता. त्यांनी शोरूम तर उघडलं परंतु, कंपनीकडून शोरूमसाठी कोणत्याही प्रकारचं सामान पाठवण्यात आलं नाही. ज्या दुकानातून बीइंग ह्युमन ज्वेलरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, ते दुकान देखील मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे व्यापाऱ्याला सामान मिळणं अवघड झालं आहे. याशिवाय बीइंग ह्युमन वेबसाइटवर दिलेला नंबर देखील बंद आहे.
१० दिवसात सलमानला द्यावं लोणार उत्तर
व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून सलमानला समन्स पाठवण्यात आले आहेत. त्याचं उत्तर १० दिवसात देणं अपेक्षित आहे. व्यापाऱ्याच्या माहितीनुसार, सलमानने स्वतः त्याला ‘बिग बॉस’ च्या सेटवर बोलावलं होतं. त्याची प्रत्येक मदत करण्याचं आश्वासनही दिलं होतं. तक्रारदाराने एक व्हिडीओ पोलिसांकडे सुपूर्त केला आहे ज्यानुसार सलमानने त्याच्या शोरूमच्या उदघाटन समारंभाला उपस्थित राहण्याचं म्हटलं होतं. परंतु, वेळ नसल्याने सलमान त्याठिकाणी जाऊ शकला नाही.
रिया चक्रवर्तीसाठी ‘चेहरे’ पाहणार असाल तर दिग्दर्शक काय म्हणातायत हे वाचाच!