Home ताज्या बातम्या ‘आता वारकऱ्यांना घरी बसवून मुख्यमंत्री फोटोत झळकताहेत’

‘आता वारकऱ्यांना घरी बसवून मुख्यमंत्री फोटोत झळकताहेत’

0
‘आता वारकऱ्यांना घरी बसवून मुख्यमंत्री फोटोत झळकताहेत’

हायलाइट्स:

  • विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री रवाना.
  • आषाढी वारीवरील निर्बंधांवर भाजपने ठेवले बोट.
  • वारकऱ्यांना घरी बसवून मुख्यमंत्री फोटोत झळकताहेत!

मुंबई:आषाढी यात्रा यंदाही करोना संकटाच्या सावटाखाली होत असून विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपूरला रवाना झाले आहेत. त्याबाबत बातम्या झळकत असतानाच भाजपने यावर तीरकस शब्दांत टीकेचा बाण सोडला आहे. ( BJP Targets CM Uddhav Thackeray )

वाचा: तुफान पावसात मुख्यमंत्री सपत्निक पंढरपूरला रवाना, स्वत: चालवतायत गाडी

मुंबईसह राज्यात सध्या तुफान पाऊस कोसळत आहे. या पावसातच मुख्यमंत्री ठाकरे पंढरपूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री स्वत: कार चालवत असल्याचे फोटो आणि व्हिडिओही झळकले आहेत. यावरूनच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीकेचा सूर काढला आहे. उपाध्ये यांनी एक स्वरचित कविता ट्वीट करत त्यामाध्यमातून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. राज्यातील जनतेचे जिणे हराम झाले आहे. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशा स्थितीतही मुख्यमंत्री घरातूनच काम करत होते. आता मात्र वारकऱ्यांना घरी बसवून मुख्यमंत्री फोटोमध्ये झळकत आहेत, असा निशाणा उपाध्ये यांनी साधला आहे.

वाचा: फडणवीस सरकारच्या काळातही ‘पेगॅसस कांड’?; चौकशीची मागणी

जनतेचे जिणे हराम
मुख्यमंत्र्यांचे घरातून काम

पावसाने मुंबईचा चक्का जाम
मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम

एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम
तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम

तुका म्हणे माझा
विठ्ठल झाकोळला…
वारकरी भक्तांना
बसवुनी घरी,
फोटोमध्ये झळकती
मुख्यमंत्री…

असे ट्वीट केशव उपाध्ये यांनी केले आहे.

दरम्यान, करोनाचा धोका कायम असल्याने यंदाही आषाढी यात्रा कोविड नियम पाळूनच होत आहे. पंढरपुरात केवळ चारशे वारकऱ्यांनाच प्रवेशास परवानगी देण्यात आली आहे. पंढरपूर व परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. उद्या पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांची शासकीय पूजा होणार असून पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.

वाचा: ‘महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात!’

Source link