हायलाइट्स:
- ‘तारक मेहता का’ मालिकेला मुनमुने अलविदा अफवा
- आजही मुनमुन दत्ता कार्यक्रमाचा भाग आहे, निर्मात्यांनी केला दावा
- जातीवाचक शब्दप्रयोग केल्यामुळे मुनमुन दत्ता झाली होती ट्रोल
तारक मेहता का उल्चा चश्मा मालिकेची निर्मिती नीला फिल्म प्रॉडक्शन करत आहे. या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, मुनमुनने ही मालिका सोडल्याच्या ज्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत, त्या खोट्या आहेत. लवकरच ती मालिकेत दिसणार आहे.
दरम्यान, एका वेबपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार मुनमुनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर ती मालिकेच्या सेटवर दिसलेली नाही. मालिकेत तिच्या नसण्यावरही काही भाष्य झालेले नाही. त्यामुळे तिने ही मालिका सोडली की काय असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता.
या कारणाने मुनमुन झाली ट्रोल
काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मेकअप करण्यासंदर्भात व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तिने जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. यामुळे मुनमुनला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. जेव्हा सोशल मीडियावर ती ट्रोल होऊ लागली तेव्हाच तिने याप्रकरणी सर्वांची माफी मागणारा व्हिडिओ शेअर केला होता. शब्दाचा अर्थ माहिती नसताना तो वापरल्यामुळे चुकीचा अर्थ पसरला. कुणालाही दुखवण्याचा हेतू नसल्याचे मुनमुनने या व्हिडिओमध्ये सांगितले होते. मात्र त्यानंतरही तिच्या विरोधात अॅट्रोसिटी अंतर्गंत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाच झाली असता कोर्टाने याप्रकरणी कारवाई करण्यास मनाई केली. त्यामुळे मुनमुनला मोठा दिलासा मिळाला होता.