Home ताज्या बातम्या coronavirus in maharashtra latest updates करोना: आज राज्यात २५,६१७ रुग्ण झाले बरे, नवे बाधित १५,२२९

coronavirus in maharashtra latest updates करोना: आज राज्यात २५,६१७ रुग्ण झाले बरे, नवे बाधित १५,२२९

0
coronavirus in maharashtra latest updates करोना: आज राज्यात २५,६१७ रुग्ण झाले बरे, नवे बाधित १५,२२९

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार २२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण २५ हजार ६१७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ३०७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात आज १५ हजार २२९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज निदान झालेल्या रुग्णांच्या संख्येहून अधिक आहे. आज एकूण २५ हजार ६१७ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्याही काहीशी वाढल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात ३०७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 15229 new cases in a day with 25617 patients recovered and 307 deaths today)

आज मृत्यूत किंचित वाढ दिसत असली तरी राज्यातील मृत्यूदर १.६८ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आज २५ हजार ६१७ रुग्ण बरे होऊन आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ९७४

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ९७४ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी ती घटत आहे. पुण्यात एकूण २६ हजार ४४३ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार २४५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १६ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १९ हजार ०६८ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ९ हजार ७१९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार १९४ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- अनलॉकडाउनचा गोंधळ: ‘अंधेर नगरी, चौपट राजा’; भाजपचा निशाणा

या बरोबरच अहमदनगरमध्ये ९ हजार ०४८ इतकी आहे. औरंगाबादमध्ये ३ हजार ५८५, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ७५३ इतकी आहे. जळगावमध्ये ३ हजार ३३३, तसेच तर रायगडमध्ये एकूण ५ हजार २०६ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या ३ हजार ८३६, तर, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गोंदिया जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ६०१ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- … तर ओबीसी आरक्षणाला हात लावण्याची सरकारची हिम्मत झाली नसती: देवेंद्र फडणवीस

१५,६६,४९० व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ५७ लाख ७४ हजार ६२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख ९१ हजार ४१३ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५ लाख ६६ हजार ४९० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ७ हजार ०५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’; मनसेचा महापौर पेडणेकर यांना टोला

Source link