coronavirus in mumbai updates: मुंबईकरांना दिलासा; आज दिवसभरात ४७८ करोना रुग्णांचे निदान, मृत्यू ९

coronavirus in mumbai updates: मुंबईकरांना दिलासा; आज दिवसभरात ४७८ करोना रुग्णांचे निदान, मृत्यू ९
- Advertisement -

मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज रविवारी कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत किंचितशी घट झाली असून मुत्यूंची संख्या देखील तुलनेने कमी झाली आहे. गेल्या २४ तासात ४७८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ५५५ इतकी होती. तर, दिवसभरात ७०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. काल ही संख्या ६६६ इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या १५ इतकी होती. (mumbai registered 478 new cases in a day with 701 patients recovered and 9 deaths today)

याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३ हजार ०७७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ६३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ९२६ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

क्लिक करा आणि वाचा- राज्याला मोठा करोनादिलासा; आज ७,६०३ रुग्णांचे निदान, बरे होणारे रुग्ण दुपटीने अधिक

मुंबईत आज २७ हजार ८२७ चाचण्या

मुंबईत आज एकूण २७ हजार ८२७ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये ५ सक्रिय कंटेनमेंट झोन असून एकूण ६७ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- पटोलेंवर पाळत का ठेवत आहेत, हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी सांगावे: फडणवीस

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – ४७८
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ७०१
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०३०७७
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९६%
एकूण सक्रिय रुग्ण- ७१२०
रुग्ण दुपटीचा कालावधी- ९२६ दिवस
कोविड वाढीचा दर (०५ जून ते ११ जुलै)- ०.०७ %

क्लिक करा आणि वाचा- मल्लिकार्जुन खरगे यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, केला ‘हा’ आरोप

Source link

- Advertisement -