Home बातम्या आंतरराष्ट्रीय Coronavirus vaccine करोनावर मात केलेल्यांना लशीचा एकच डोस पुरेसा? संशोधनात नवा खुलासा

Coronavirus vaccine करोनावर मात केलेल्यांना लशीचा एकच डोस पुरेसा? संशोधनात नवा खुलासा

0
Coronavirus vaccine  करोनावर मात केलेल्यांना लशीचा एकच डोस पुरेसा? संशोधनात नवा खुलासा

[ad_1]

हायलाइट्स:

  • करोना लशीबाबत सध्या जगभरात विविध अभ्यास, संशोधने सुरू
  • करोना लशीचे दोन डोस घेणे आवश्यक; संशोधनात नवा दावा
  • करोनाच्या आजारावर मात दिलेल्या व्यक्तींना लशीचा एकच डोस पुरेसा

लंडन:करोना लशीबाबत सध्या जगभरात विविध अभ्यास, संशोधने सुरू असून त्यातून अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत. करोना विषाणूविरोधात अॅण्टीबॉडी तयार करण्यासाठी लशीचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधन अभ्यासात एक नवीन बाब समोर आली आहे. करोनाच्या आजारावर मात दिलेल्या व्यक्तींना लशीचा एकच डोस पुरेसा आहे. लशीच्या एकाच डोसमुळे त्यांच्या शरिरात पुरेशी प्रतिकार शक्ती निर्माण होते.

ब्रिटनमधील इम्पिरिअल कॉलेज, क्वीन मेरी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. एका वैद्यकीय नियतकालिकेत हे संशोधन प्रकाशित झाले आहे. करोनाच्या आजारावर मात दिलेल्या व्यक्तींमध्ये लशीच्या एका डोसमुळे शरिरात आवश्यक तेवढ्या अॅण्टीबॉडीज विकसित झाल्याचा दावा त्यांनी केला. शास्त्रज्ञांनी करोनाच्या दक्षिण आफ्रिका वेरिएंटवर हे संशोधन केले होते. हेच संशोधन ब्राझील आणि भारतीय वेरिएंटवरही लागू होऊ शकते अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

वाचा:‘भारतात करोनामुळे गंभीर परिस्थिती; लष्कराची मदत घ्यावी’

या संशोधनाासाठी शास्त्रज्ञांनी फायजर-बायोएनटेकच्या लशीचा वापर केला. ज्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यामध्ये करोनाची अतिशय किरकोळ स्वरुपाची लक्षणे होती. काहीजणांमध्ये ही लक्षणेही नव्हती. त्यातील लशीचा एक डोस केंट आणि दक्षिण आफ्रिकेच्या वेरिएंटविरोधात प्रभावी आढळून आला. ज्यांना करोनाची लागण झाली नव्हती त्यांच्या शरिरात पहिल्या डोसनंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी होती आणि त्यांना बाधा होण्याचा धोका होता.

वाचा: फायजरची भारताला ७ कोटी डॉलरची मदत; लशीबाबत सरकारसोबत चर्चा सुरू

वाचा: करोनाच्या ब्राझील, ब्रिटीश आणि भारतीय वेरिएंटवर ‘ही’ लस प्रभावी!

इम्पिरिअल कॉलेजचे प्राध्यापक रोजमेर बॉयटन यांनी सांगितले की, ज्यांना करोनाची लागण झाली नव्हती अशांना लशीचा पहिला डोस देण्यात आला. त्यांना करोनाच्या नव्या स्ट्रेनपासून संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे लशीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. करोनाचे नवीन वेरिएंट, स्ट्रेन समोर येत आहेत. त्यामुळे अधिकाधिक जणांनी लस घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

[ad_2]

Source link