ICC World Cup 2019 : मैदानाबाहेर पकडलेल्या ‘या’ आहेत सुपर कॅचेस

- Advertisement -

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आतापर्यंत मैदानामध्ये पकडलेल्या भन्नाय कॅचेस तुम्हा पाहिल्या असतील. पण मैदाना बाहेर पकडलेल्या सुपर कॅचेसचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर झाला आहे आणि हा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. 

हा भन्नाट कॅच पाहिल्यावर चाहतेच करतायत ‘त्याला’ सॅल्यूट
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलची सेलिब्रेशनची स्टाइल भन्नाटच आहे. सेलिब्रेशन करताला कॉट्रेल हा कडक सॅल्यूट ठोकतो. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात कॉट्रेलने एक भन्नाट कॅच पकडली आणि त्यानंतर चाहतेच त्याला सॅल्यूट ठोकत आहेत.

एकेकाळी 4 बाद 38 अशी परिस्थिती असलेल्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भन्नाट पुनरागमन केले. स्टीव्हन स्मिथ आणि नॅथन कल्टर निल यांनी अर्धशतके झळकावत ऑस्ट्रेलियाला तारले. स्मिथने दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला स्थैर्य मिळवून दिले. पण याच स्मिथचा अफलातून झेल कॉट्रेलने सीमारेषेवर पकडला आणि चाहत्यांनी एकच जल्लोश केला.
नेमके काय घडले
स्मिथने ओशाने थॉमसचा 45 षटकातील दुसरा चेंडू चांगलाच टोलवला. हा चेंडू आता थेट सीमारेषे पार जाणार आणि स्मिथला षटकार मिळणार असे वाटत होते. पण त्यावेळी कॉट्रेल धावून आला आणि त्याने चेंडू पकडला. पण त्यावेळी आपला पाय सीमारेषेला लागणार, हे त्याला कळून चुकले. त्यावेळी कॉट्रेलने चेंडू मैदानात उंच उडवला आणि त्यानंतर तो सीमारेषेबाहेर गेला. त्यानंतर काही क्षणातच तो मैदानात आला आणि त्याने अप्रतिम झेल टिपला.

त्येकाची सेलिब्रेशन करण्याची एक वेगळी स्टाइल असते. क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या अनोख्या स्टाइल पाहायला मिळतात. वेस्ट इंडिजच्या संघाने भारतामध्ये ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकल्यावर भन्नाट चॅम्पियन्स डान्स केला होता. आता इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात सलाम करून सेलिब्रेशन करण्याची त्यांची पद्धत अनोखी अशीच आहे.

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल हा विकेट मिळाल्यावर सलाम ठोकत सेलिब्रेशन करतो. हे साऱ्यांनीच पाहिले आहे. पण तो असे सेलिब्रेशन का करतो, हे तुम्हाला माहिती नसेल. पण या प्रश्नाचे उत्तम वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू इयान बिशप यांनी दिले आहे.

- Advertisement -