हायलाइट्स:
- राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत.
- करोना स्थिती लक्षात घेऊनच पुढची पावले.
- टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याचा विचार.
वाचा: धारावी करोनामुक्त होण्याच्या दिशेने; आज अवघ्या एका रुग्णाची नोंद
ब्रेक द चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथील करायला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथील करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.
वाचा:धोक्याची घंटा; निर्बंध शिथील होताच ‘या’ जिल्ह्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ
निश्चित करण्यात येणाऱ्या निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते शासन निर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
वडेट्टीवार बोलून फसले!
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत अनलॉक केले जाणार असल्याची घोषणा केली होती. पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या बेड्सची उपलब्धता या आधारावर जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली असून हे जिल्हे पाच टप्प्यांत लॉकडाऊनमुक्त होतील, असे त्यांनी नमूद केले होते. या जिल्ह्यांची टप्पेनिहाय यादी देताना वडेट्टीवार यांनी निर्बंध कसे शिथील होतील, हेसुद्धा सांगितले होते. पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे अनलॉक होतील. दुसऱ्या टप्प्यात सहा, तिसऱ्या टप्प्यात १० आणि चौथ्या टप्प्यात दोन जिल्हे अनलॉक होतील, असे त्यांनी नमूद केले होते. पॉझिटिव्हिटी रेट ज्या जिल्ह्यांत पाच टक्क्यांच्या खाली आहे तिथे उद्यापासून (४ जून) लॉकडाऊन पूर्णपणे उठवण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, असा निर्णय झालेलाच नाही, प्रस्ताव विचाराधीन आहे, असे सरकारने स्पष्ट केल्याने वडेट्टीवार बोलून फसल्याचे दिसत आहे.
वाचा:मुंबई दुसऱ्या टप्प्यात होणार अनलॉक; लोकलबाबत वडेट्टीवार म्हणाले…