Home ताज्या बातम्या Pravin Darekar: डान्स बारला परवानगी कुणी दिली?; ‘या’ नेत्याचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Pravin Darekar: डान्स बारला परवानगी कुणी दिली?; ‘या’ नेत्याचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

0
Pravin Darekar: डान्स बारला परवानगी कुणी दिली?; ‘या’ नेत्याचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

हायलाइट्स:

  • मंदिरांना टाळे आणि डान्सबार खुले ही शरमेची बाब.
  • प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर डागली तोफ.
  • पोलीस आयुक्तांना निलंबित करण्याची केली मागणी.

मुंबई: महाराष्ट्रात एकीकडे देवदैवतं कुलुपात बंदिस्त आहेत, तर दुसरीकडे डान्स बार खुलेआम सुरू असून सरकारसाठी ही शरम आणणारी गोष्ट आहे. राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
( Pravin Darekar On Dance Bar Sting Operation )

वाचा: केंद्राला झटका; सहकाराचा विषय राज्यांकडेच, कोर्टाकडून ‘ती’ घटनादुरुस्ती रद्द

ठाणे येथील आम्रपाली, नटराज आणि अँटिक पॅलेस डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन प्रसार माध्यमांनी प्रसारित केले. त्यावर बोलताना दरकेर म्हणाले की, करोना मुळे अनेक गोष्टींवर बंधने घालण्यात आली आहेत. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर बंधने आली आहेत. मात्र, दुसरीकडे डान्सबारवर बंदी असतानाही ते राजरोसपणे सुरू आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई केली असली तरी ती पुरेशी नाही. गृहमंत्र्यांनी याप्रकरणी खरंतर पोलीस आयुक्तांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली.

वाचा: महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांना आता स्मार्ट मीटर; ‘हे’ आहेत फायदे

दरेकर म्हणाले की, एखादी घटना घडली की मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी छोट्या अधिकाऱ्यांचा बळी दिला जातो. बार चालू केल्याप्रकरणी ज्याचा ज्याचा संबध आहे त्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी कारवाई करून जे असे कृत्य करतात त्यांना कायमची चपराक बसेल व पुढे असे कृत्य करायला कुणी धजावणार नाही, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले. सरकार कोविडची भीती दाखवत सर्वसामान्यांना निर्बंध घालत आहेत. सामान्यांना गर्दी करू नका, असे ओरडून सांगायचे तर दुसऱ्या बाजूला डान्स बार चालू ठेवून गर्दी करत धिंगाणा घालायला मोकळीक द्यायची हे चालणार नाही. कोविड काळात असा धिंगाणा घालण्याकरता परवानगी दिली जाते ही दुर्दैवाची बाब आहे. यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली.

वाचा: अजित पवारांचा ग्रामीण भागाला खूप मोठा दिलासा; घेतला ‘हा’ निर्णय

Source link