मुंबई: लोकप्रियतेवरून मालिकेचा टीआरपी ठरतो आणि कोणती मालिका वरचढ ठरली, हे दर आठवड्याला टीआरपीवरून कळतं. काही आठवड्यांपासून देवमाणूस मालिका टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल होती, मात्र आता देवमाणूस मालिकेला मागे टाकत ‘मुलगी झाली हो‘ या मालिकेनं अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठी टीव्ही मालिकांमध्ये वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स पाहायाला मिळत आहेत. प्रत्येक मालिका टीआरपीच्या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी प्रयत्न करताना दिसतेय. यातच ‘मुलगी झाली हो’ ही मालिका या आठवड्यात पहिल्या क्रमांकाची मालिका ठरली आहे.

दुसऱ्या स्थानावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ ही मालिका आहे. तर, तिसऱ्या क्रमांकावर ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आहे.
काही आवड्यांपूर्वी पहिल्या क्रमांकावर असलेली देवमाणूस मालिका आता स्पर्धेत पिछडीवर पडली आहे. ही मालिका चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या क्रमांकावर ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका आहे.
विशेष म्हणजे अग्गंबाई, सुनबाई, येऊ कशी तशी मी नांदायला, सांग तू आहेस ना? आई कुठे काय करते? या मालिका टीआरपीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत.
- Advertisement -