हायलाइट्स:
- कार्यक्रमादरम्यान सलमानने कतरिनाला केला ड्रेस ठीक करण्याचा इशारा
- सुरुवातीला गोंधळलेल्या अवस्थेत असणाऱ्या कतरिनाने हसत हसत केला ड्रेस ठीक
- सलमानच्या स्त्रीदाक्षिण्याचं चाहते करतायत कौतुक
‘आरक्षण नाही, मराठीला अभिजात दर्जा नाही’, केदार शिंदे भडकले
सलमान आणि कतरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात सलमान कतरिनाला तिचा ड्रेस ठीक करण्यासाठी इशारा करत आहे. हा व्हिडीओ २०१७ च्या आयफा पुरस्कारांच्या प्रेस मीटचा आहे. या पुरस्कार सोहळ्यात कतरिनाने डिप नेकचा ड्रेस घातला होता. पूर्ण कार्यक्रमादरम्यान सलमान फक्त कतरिनाकडेच पाहत होता. थोड्या वेळाने जेव्हा त्या ड्रेसचा गळा आणखीनच खाली गेला तेव्हा सलमानला राहवलं नाही आणि त्याने कतरिनाला ड्रेसचा गळा नीट करण्याचा इशारा केला. सलमानचा इशारा पाहून कतरिना सुरुवातीला थोडीशी गोंधळली परंतु, थोड्या वेळातच कतरिना हसत हसत मागे वळली आणि तिने ड्रेस नीट केला.
पुन्हा एकदा सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून प्रेक्षक पुन्हा एकदा सलमानच्या चांगुलपणाचे चाहते झाले आहेत. ते सलमानचं कौतुक करत आहेत. या कार्यक्रमादरम्यान कतरिना, सलमान यांच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट देखील उपस्थित होती.