मुंबई- बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या गायकांपैकी एक म्हणजे मिका सिंग चं जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. मध्यरात्री मुंबईच्या पावसात मध्यरात्री मिका सिंगची गाडी बंद पडली. शनिवारी रात्री मिका घरी जात असताना त्याची एसयूव्ही रस्त्याच्या मधोमध बंद पडली आणि अडकली. दरम्यान, लोकांना जेव्हा कळले की गायक मिका सिंगची गाडी रसत्च्याच्या मधोमध बंद पडली आहे, तेव्हा शेकडो लोक मदतीसाठी धावले.
मिका सिंग यापूर्वी सोशल मीडियावर कमाल आर खान सोबतच्या भांडणामुळे चर्चेत आला होता. दरम्यान मिका सिंग आणि केआरकेचा हा वाद सलमानमुळे चर्चेत आला होता. केआरकेने सलमान खानविरोधात आक्षेपार्ह विधानं केली होती. यावेळी मिकाने सलमानची बाजू घेत केआरकेला चांगलेच सुनावले होते. शनिवारी मिका सिंग राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या संगीत सोहळ्यात दिसला होता. या कार्यक्रमात त्याने उत्तम गाणीही गायली होती.
- Advertisement -