बुलडाणा / मलकापूर ( दि 30 एप्रिल ) – मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे पोहेकॉ श्याम शिरसाट यांचे पुत्र रोहन यांच्यावर अचानक काळाने घाला घातला. २९ एप्रिल रोजी रात्री रोहन याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने अवघ्या १८ व्या वर्षी त्याचे निधन झाले. त्याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पो.हे.कॉ. श्याम शिरसाट हे जनमानसात सर्वत्र परिचित असलेले तसेच सर्वांच्या सुख-द:खात धावून जाणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांचे पुत्र रोहन याच्या झालेल्या निधनाचे वृत्त परिसरात कळताच समाजमन हेलावून गेले, अनेकांकडून शोकसंवेदनाही व्यक्त करण्यात आल्या. चि.रोहनच्या अकाली निधनाने शिरसाट परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रोहन याच्या पश्चात वडील, आई, एक भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.
- कल्याणकारी योजना आणि नागरिक यांना जोडणारा उपक्रम…. मुख्यमंत्री योजनादूत
- कल्याणकारी योजना आणि नागरिक यांना जोडणारा उपक्रम…. मुख्यमंत्री योजनादूत
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बुद्ध विहाराचे लोकार्पण
- दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- कृषी समृद्धी नवनगरे विकसित करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घावी – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे