Home ताज्या बातम्या गेवराईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

गेवराईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

0

बीड : गेवराईमधुन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेवराई तालुक्यातील कानडा पिंपळगाव‌ येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे वृत्त आहे. या बलात्कारातुन पीडित अल्पवयीन मुलगी ही तीन महिन्यांची गरोदर असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे. यावेळी आरोपी रामेश्वर माळी याच्या विरोधात गेवराई पोलीस स्टेशन मध्ये कलम ३७६,३४१,५०६ लैंगिक आत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असुन तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. पुढील तपास पीएसआय मनिषा जोगदंड या करत आहे.