अमरावती, दि. २१: जिल्हा प्रशासनाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या तीन नवीन वाहनांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी आमदार प्रविण पोटे, प्रविण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलिस आयुक्त राकेश ओला आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहने खरेदी केली आहेत. ही वाहने तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना वितरीत करण्यात आली आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी विश्रामगृह येथे वाहनांना हिरवी झेंडी दाखविली. तसेच संबंधितांना वाहने सुपूर्द केली.
- Advertisement -









WhatsApp