
नागपूर दि.११: एअर फिशच्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यात एअर फिश निर्मिती व संचालन केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रकल्प अहवाल सादर केला.
एअर फिशचे सिंगापूर येथील टॅन कोक ही युजिन व शिवांश मित्तल तसेच सिद्धार्थ शर्मा, अमोल खंते यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, यावेळी अर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.
एअर फिश फ्लाईंग बोट प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात देखभाल, दुरुस्ती व पुनर्बांधणी (एमआरओ) तसेच विमाननिर्मिती व उत्पादन सुविधा विकसित करण्याच्या संधीचा शोध घेतला जात आहे. राज्यात विमान वाहतूक आणि आधुनिक जलवाहतूक तंत्रज्ञानाची सक्षम परिसंस्था इकोसिस्टीम उभारणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे यावेळी शिवांश मित्तल यांनी सांगितले.
००००
- Advertisement -

WhatsApp