मुंबईत ८ व ९ ऑक्टोबर रोजी सायरन यंत्रणेची चाचणी – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ७ : महासंचालक, नागरी संरक्षण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर (Centre for Development of Telematics (C-DOT), C-DOT Campus), मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी ८ व ९ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

    बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड इमारत, फोर्ट, मुंबई तसेच नागरी संरक्षण, क्रॉस मैदान येथील इमारतीवर बसविण्यात आलेल्या सायरनची चाचणी घेण्यात येणार आहे.

    या कालावधीत सायरनचा आवाज ऐकू आल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये अथवा कोणताही गैरसमज करून घेऊ नये. सायरन वाजविण्याची प्रक्रिया ही केवळ प्रोटोटाइप सायरन उपकरणाच्या चाचणीचा भाग आहे. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण, बृहन्मुंबई यांनी केले आहे.

    ००००

    - Advertisement -